मरणोत्तर नेत्रदान अभियानाला प्रतिसाद

मरणोत्तर नेत्रदान अभियानाला प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दि ब्लाईड वेल्फेअर ऑर्गनायझेशन(The Blind Welfare Organization) व मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक ( MVP )यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त के.टी.एच.एम. महाविद्यालयापासून मरणोत्तर नेत्रदान अभियानाची (Posthumous Eye Donation Campaign) सुरुवात करण्यात आली.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी आकाशात फुगे सोडून सुरुवात केली. या वॉक फॉर आय डोनेशन या अभियानात अंध बांधव, हजारो नाशिककर व विद्यार्थी सहभाग झाली होते. त्यामध्ये प्रामुख्याने मविप्र संस्था, सपकाळ नॉलेज सिटी, तुलसी आय हॉस्पिटल, रोटरी क्लब, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप, निमा, आयमा, इंदिरानगर, कृषिनगर, गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅक, गजानन सेवा संस्था नाशिक यांचा सहभाग होता.

यावेळी अरुण भारस्कर, मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, संचालक शिवाजी पा. गडाख, संचालक अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, रवींद्र सपकाळ, रोटरी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला, कल्पना पांडे, विद्या दवे, शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. भास्कर ढोके, डॉ. अजित मोरे, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, तुषार चव्हाण, कल्पना पांडे, सुधाकर देशमुख, प्राचार्य, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

सदर वॉक मॅरेथॉन चौक येथून कॅनडा कॉर्नर, एचपीटी महाविद्यालय, डॉन बॉस्को स्कूल गंगापूररोडमार्गे पुन्हा मॅरेथॉन चौकात समारोप येऊन करण्यात आला. सदर अभियानाचा उद्देश नेत्रदानासाठी जनजागृती हा असून आपण केलेल्या मरणोत्तर नेत्रदानामुळे हे सुंदर जग एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीला बघता येईल. त्यामुळे आपण जरूर नेत्रदान करावे व जास्तीत जास्त नाशिककरांनी या अभियानात सहभाग नोंदवून आपल्या जवळील लोकांनादेखील सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.

यावेळी तुलसी आय व डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज यांच्या वतीने मरणोत्तर नेत्रदानाचे अर्ज उपलब्ध करून भरून घेण्यात आले. यावेळी वॉकमध्ये एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजना, नेव्हलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कामगिरी बजावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com