पीएफच्या ‘उमंग’ अ‍ॅपला प्रतिसाद
नाशिक

पीएफच्या ‘उमंग’ अ‍ॅपला प्रतिसाद

अकरा लाख सदस्यांनी घेतला लाभ

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर । प्रतिनिधी Satpur

भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) सभासदांनी कोविड काळात ‘उमंग’ अ‍ॅपचा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत 11 लाख 27 हजार सदस्यांनी लाभ घेतला. गतवर्षाच्या तुलनेत लाभ घेण्याचे प्रमाण 180 टक्क्यांनी वाढले आहे.

नव्या युगातील उमंग या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निधी सभासदांना करोनाच्या संकटकाळात कार्यालयात धाव न घेता घरूनच विनासायास सेवा मिळवली आहे. कोणत्याही सभासदाला केव्हाही उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलवरून पीएफच्या विविध 16 सेवांचा लाभ घेता येऊ शकतो.

या सेवा प्राप्त करण्यासाठी पीएफ कार्यालयातून युनिवर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नोंदवून घेणे गरजेचे आहे. त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक पीएफ कार्यालयात रजिस्टर केलेला असणे गरजेचे आहे. त्यानंतरच या विविध सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

डिसेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ 3 लाख 97 हजार नोंदणीकृत सभासदांनी याचा लाभ घेतला होता. ऑगस्ट 2019 ते जुलै 2020 या काळात सदस्य पोर्टलच्या माध्यमातून भविष्य निधी सदस्यांकडून 27 कोटी 55 लाख सबस्क्राईब करण्यात आले.

ऑनलाईन सुविधा

आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक अकाऊंट लिंक करण्यासाठी केवायसी करता येते, यूएएन नंबर अ‍ॅक्टिव्हेट करता येतो, पासबुक बघता येते. नॉमिनेशन्स अर्थातच वारस लावता येते. दरमहा एसएमएसने पैसा जमा झाल्याची सूचना, कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करता येतो, निवृत्तीनंतर फायनल विड्रॉलचा क्लेम करता येतो. पेन्शनचा फॉर्म भरता येतो. मोबाईल नंबरसाठी मॉडिफिकेशन करता येते. कंपनी बदलल्यास पीएफ ट्रान्सफर करता येतो. निवृत्तीनंतर पेन्शन खाते बघता येते. दरवर्षी हयातीचा दाखला भरता येतो. पीएफबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार देता येते.

सदस्यांच्या वाढल्या हिटस्

उमंग अ‍ॅपद्वारे मेंबर पासबुक या सुविधेला 244 कोटी 77 लाख एपीआय हिटस् मिळाले. पीएफ आपल्या 66 लाख पेन्शनधारकांना घरी बसून सुरक्षितरीत्या आपली सेवा सुनिश्चित करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याची सुविधा दिली आहे.

या दोन्ही सेवासुविधांचा पेन्शनधारकांनी लाभ घेतला. एप्रिल ते जुलै 2020 पर्यंत कोविड-19 महामारी या कालावधीत पेन्शन पासबुक 18 लाख 52 हजार एपीआय हिट मिळाले. तर जीवन प्रमाणपत्र सेवा अद्ययावत केल्यावर 29 हजार 773 एपीआय हिट नोंद झाली.

इतर महत्त्वाच्या सेवांपैकी यूएएन अ‍ॅक्टिवेशन 21 लाख 27 हजार 942 एपीआय हिट मिळाले. इ-केवायसी सेवांना एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत 13 कोटी 21 लाख 7 हजार 910 एपीआय हिट मिळाल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com