मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांस प्रतिसाद

मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांस प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पर्यावरण पुरक गणेशोत्सव Ganesh Festival साजरा करण्यासाठी नाशिक महानगर पालिकेने NMC विशेष नियोजन केले जात आहे. श्री गणेश विसर्जनामुळे होणारे नदीचे तसेच पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी To prevent damage to the environment मनपातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे.

विसर्जनासाठी मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांना Shri Ganesh Idols Collections प्रतिसाद मिळत असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ आवेश पलोड यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात दिड दिवसांच्या गणेश विसर्जना निमित्त तब्बल 369 नागरिकांनी त्यांच्या घरगुती गणेशाचे विसर्जन नदी पात्रात न करता मनपाच्या गणेश मुर्ती संकलन केंद्रांवर मुर्ती जमा केल्या व मनपाच्या पर्यावरण संवर्धन मोहीमेस हातभार लावला.

तसेच यापुढील 5,7 व 10 व्या दिवशी गणेश मुर्तींचे विसर्जन करणार्‍या नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांनी त्यांच्या गणेश मुर्ती मनपाच्या संकलन केंद्रांवर जमा करण्याचे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com