
नाशिक । प्रतिनिधी Nashik
‘देशदूत’ माध्यम समूहातर्फे घेण्यात येणार्या पत्रकारितेची तोंडओळख व सोशल मीडिया अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभ्यासक्रमाच्या आता मोजक्याच जागा शिल्लक आहेत.
जून महिन्यात घेतलेल्या पहिल्या टप्प्यानंतर वाचक व माध्यमांचे शिक्षण घेऊ इच्छिणार्यांकडून केल्या जाणार्या मागणीनंतर हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
‘देशदूत’ने तोंडओळख पत्रकारितेची व सोशल मीडिया या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. माध्यम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले ‘देशदूत’ मधील संपादक हा अभ्यासक्रम झूम अॅपवर ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहेत.
पत्रकारितेची तोंडओळख
अभ्यासक्रमात पत्रकारिता, बातमीचे लिखाण, लेखन कौशल्य, वृत्त संकलन, ग्रामीण पत्रकारिता, ब्लॉग लिखाण आदी विषय शिकवण्यात येणार आहेत. सोशल मीडिया अभ्यासक्रमात इंटरनेट, सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्विटर, यू-ट्यूब, वेबसाईट, ब्लॉग, सिटीझन जर्नालिस्ट, विविध बिले ऑनलाईन भरणे आदी विषय शिकवण्यात येणार आहेत.
प्रत्येक अभ्यासक्रमाचे शुल्क एक हजार रुपये आहे. दोन्ही अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास 300 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. प्रवेशप्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी 9423487920 या क्रमांकावर संपर्क साधावा. अभ्यासक्रमासाठी मोजक्याच जागा असल्याने http://deshdoot.org/course/ या वेबसाईटवर जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.