पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद

पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणपती (Ganpati) हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले...

कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा (Environment) ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मलबार गोल्ड अँड डायमंडच्या दालनात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा पार पडली.

यावेळी नंदिनी रामचंदानी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यशाळेत मुलं-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी व्यवस्थापक रोहित सोनार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com