जेलरोडला रक्तदान शिबिरास प्रतिसाद

जेलरोडला रक्तदान शिबिरास प्रतिसाद

नाशिकरोड । प्रतिनिधी

करोना महामारीच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रक्तदान शिबिर भरविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत जेलरोड प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात 35 पिशव्या रक्त संकलित झाले.

ज्येष्ठ नागरिक व महिलांना करोना लसीकरणासाठी केंद्रावर जाण्यासाठी वाहन नसल्याने नगरसेवक प्रशांत दिवे यांनी मोफत वाहन सेवा सुरु केली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्याहस्ते झाला.

याप्रसंगी नगरसेविका मंगला आढाव, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल, माजी आमदार योगेश घोलप, विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे,

नगरसेवक सूर्यकांत लवटे, अशोक सातभाई, कुलदिप आढाव, रोहन आढाव, महेश बडवे, दिनकर आढाव, बाबुराव आढाव, बबलुशेठ चंदणानी, नितीन चिडे, मसुद जिलानी, गणेश गडाख, संजय गांगुर्डे, कैलास आढाव, उमेश शिंदे, राम पांडे, संदिप ठाकूर, मनोज भागवत, आकाश आढाव, मिलिंद शिरसाठ, अक्षय आहिरे, प्रशिक आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com