
नाशिक । Nashik
आदिवासी विकास विभाग (Tribal Development Department) आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (Tribal Research and Training Institute) यांच्या संयुक्त विद्यमाने ईदगाह मैदान (EIdgah Maidan nashik) येथे पाचदिवसीय आदिवासी महोत्सवाचे (Tribal Festival) आयोजन करण्यात आले आहे...
या महोत्सवात नाशिकसह (Nashik) पालघर (Palghar) नंदुरबार (Nandurbar) आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव त्यांच्या कलाकृती घेऊन दाखल झाले आहेत.
तसेच महोत्सवात आदिवासी रूढी, पंरपरा, कला, संस्कृती, यांचे संवर्धन कशा पद्धतीने केले जाते याबद्दल माहिती देण्यात येत आहे.
या महोत्सवात नाशिककरांना सागवान लाकडावर चितारलेली कलाकृती, गवतापासून तयार केलेल्या वस्तू, वारली चित्रकला आणि आदिवासी खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन पाहायला मिळत असून आदिवासी बांधव महोत्सवात वस्तू खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
तसेच या महोत्सवात पालघरचे चिकू, बदामसह चिकूचे लोणचे, मशरूम, हळद, नागली पीठ, सेंद्रिय तांदूळ, भगर अशा विविध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय तरपा व आदिवासी वाद्येही पाहणे व खरेदी करता येणार आहे.
तर दुसरीकडे महोत्सवात सागवानी लाकडापासून तयार केलेल्या कलाकृती, वारली चित्रकला कलाकृती, वनौषधी, आदिवासी बांधवांचे पारंपरिक दागदागिने, मुलांची खेळणी तसेच वेत व बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातूकाम आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, हा महोत्सव येत्या मंगळवारपर्यंत (दि. ३१) चालणार असून या महोत्सवात आदिवासी नृत्य आणि लघुपट (Tribal dance and short films) दाखविण्यात येणार असल्याने नाशिककरांना आदिवासी संस्कृती (Tribal culture) जवळून बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे.