
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकतेची (Modern) कास धरून विद्यार्थी (students) हित जोपासणारे तसेच प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा समाजहिताची भूमिका बजावणार्या शिक्षकांचा सन्मान (Respect for teachers) समाजाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना केले.
येथील बाल गंधर्व मंगल कार्यालयात तालुका जुनी पेंशन संघटनेच्या वतीने शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन (Educational Calendar Publishing) व द्रोणाचार्य सन्मान सोहळ्याचे (Dronacharya Honor Ceremony) आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कृषिमंत्री भुसे बोलत होते. अकोला (akola) येथील गझलकार अनंत राऊत, पं.स. सभापती सुवर्णा देसाई, उपसभापती सरला शेळके, गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, जिल्हाध्यक्ष सचिन वडजे, सरचिटणीस गोरख देवढे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
स्वतःच्या पेन्शनसाठी (Pension) लढा देत असतांनाच संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविणे अतिशय स्तुत्य असल्याचे भुसे यांनी पुढे बोलतांना सांगितले. शिक्षक (Teacher) हा सोशिक आणि संयमी घटक असून पालकांप्रमाणेच शिक्षकाची भूमिका जीवन विकासात महत्वाचे असल्याचे मत कवी अनंत राऊत यांनी मांडले. यावेळी विनायक ठोंबरे, संजय शेवाळे, संजय पगार, जिभाऊ बच्छाव, भरत शेलार, राजेंद्र दिघे, पुरुषोत्तम इंगळे, किशोर सोणजे, भाऊसाहेब सोनवणे, संदीप पाटील, भाऊसाहेब पवार,
मिलिंद भामरे, नामदेव बच्छाव, विजय पिंगळे, केदार निकम, दिलीप जावरे आदी संघटना पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुमित बच्छाव यांनी तर आभार सरचिटणीस राजेंद्र खैरनार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा पदाधिकारी निलेश नहीरे, नितीन शिंदे, किरण फुलपगारे, भाऊसाहेब कापडणीस, शाम ठाकरे, भूषण कदम आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी व अमोल जगताप यांनी केले.
सन्मानित शिक्षक
सोपान भोईर इगतपुरी, किरण शिंदे दिंडोरी, सुरेखा देवरे बागलाण, जावेद कारभारी कळवण, ज्योती कुळधर येवला, जयश्री पगार देवळा, विनोद खापर्डे चांदवड, विजय तुरकूने नांदगाव, तुषार मोहणे निफाड, केशव देवरे नाशिक, यतीन शेलार साजवहाळ, नलिनी सांगळे वडेल, जितेंद्र कराडे पिंपळगाव, पूनम आमले माल्हणगाव, सुनील देसले पवारवाडी सोनाली बिलाडे, नगाव जयश्री अहिरे, पंढळवाडी.