समाजात शिक्षकांना मानाचे स्थान

समाजात शिक्षकांना मानाचे स्थान

सिन्नर । प्रतिनिधी Sinner

विद्यार्थ्यांच्या (Students) जीवनात शिक्षकाचे स्थान महत्वाचे असून चांगले संस्कार व चांगले मार्ग दाखविण्याचे कार्य शिक्षक (Teacher) उत्तम प्रकारे करतात, म्हणून समाजात आजही शिक्षकाला मानाचे आणि आदराचे स्थान आहे, असे प्रतिपादन इगतपुरी (Igatpuri) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले.

लायन्स क्लब (Lions Club) सिन्नर (Sinner) सिटीच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा (Ideal Teacher Award Ceremony) हॉटेल पंचवटीच्या सभागृहात पार पडला. त्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर लायन्स अध्यक्ष संजय सानप, सेक्रेटरी सोपान परदेशी, खजिनदार कल्पेश चव्हाण, लायन्स ट्रस्ट अध्यक्ष हेमंत वाजे, माजी अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर, प्रकल्प प्रमुख शिल्पा गुजराथी उपस्थित होते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने शेती पूरक व्यवसाय (Agricultural Supplement Business) विकसित करणे गरजेचे आहे.

कुठल्याही शिक्षण पध्दतीत विद्यार्थी (Sutdent) शिक्षकांबरोबरच समाज हा देखील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाचे माध्यमही तितकेच महत्वपूर्ण बाब आहे. मराठी माध्यम संस्कारक्षम शिक्षण देते, तर इंग्रजी माध्यम माहिती तंत्रज्ञानासाठी आवश्यक आहे.

कोणत्या माध्यमात शिक्षण घ्यावे, हे प्रथम आपले ध्येय निश्चित करुन मगच माध्यमाची निवड करावी. काळानुरुप शिक्षण पद्धतीत बदल केल्यास भावी पिढीला याचा नक्कीच फायदा होईल. श्रम, संस्कार व श्रद्धा या त्रिसुत्रीवर आधारीत शिक्षण असावे असे आवाहन त्यांनी केले.

पाथरे येथील चांगदेव मुरलीधर गुंजाळ यांना जीवनगौरव पुरस्काराने (Lifetime Achievement Award) गौरवण्यात आले. प्राथमिक विभागात चासच्या पांढरी वस्तीवरील सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ मोघा पथवे, चासच्याच हिवरशेत शाळेच्या अर्चना बाळासाहेब भालेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.

माध्यमिक विभागात लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब रंगनाथ कहांडळ, शेठ ब.ना.सारडा विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक दीपक गणपतसा बाकळ, उच्च माध्यमिक विभागात सिन्नर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.प्रकाश रघुनाथ कोकाटे यांना सन्मानीत करण्यात आले. अध्यक्ष संजय सानप यांनी प्रास्ताविक केले.

अर्चना चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. शिल्पा गुजराथी यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करुन दिला. सोपान परदेशी यांनी आभार मानले. प्रा. टी. बी. खालकर व अपर्णा क्षत्रिय यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारार्थीं शिक्षकामधून प्रा. डॉ. कोकाटे, कहांडळ, बाकळे व गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ. विजय लोहारकर, भरत गारे, डी. एम. गडाख, मनीष गुजराथी, भुषण क्षत्रिय, जितेंद्र जगताप, अरुण थोरात, राजेंद्र घुमरे, प्रताप पवार, मारुती कुलकर्णी, डॉ. विष्णू अत्रे, प्रशांत गाढे, उमेश येवलेकर, सुरेश कट्यारे, पी. आर. वारुंगसे, किरण कटारीया, जयश्री जगताप, संगीता कट्यारे, डॉ. प्रतिभा गारे, स्मिता थोरात, वैशाली सानप उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com