अभिहस्तांतरण प्रकरणे तत्काळ निकाली काढा; मनसेनेची मागणी

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

प्रलंबित मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे (Transfer cases) तत्काळ निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सहकार विभागाने (Department of Cooperation) उपनिबंधक सहकारी संस्था (Deputy Registrar Co-operative Societies) यांना निवेदन (memorandum) देऊन केली आहे.

नाशिक शहरामधील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने उपनिबंधक यांच्याकडे जवळपास दहा ते बारा हजार गृह निर्माण सोसायट्या, संस्था नोंदणीकृत आहे. मात्र या सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण करत असतांना बांधकाम व्यावसायिकांकडून वाहन पार्किंग (Vehicle parking) तसेच वाढीव चटई क्षेत्राच्या लोभापायी बांधकाम अर्धवट सोडणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे, सोसायटीसभासदांना त्रास देणे आदि प्रकार सर्रास होत असून

शासनाच्या नियमाप्रमाणे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे चार महिन्यांच्या आत निकाली काढणे अपेक्षित असतांना प्रकरणे प्रलंबित असून ही प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे, सहकार सेनेचे प्रदेश सचिव राकेश परदेशी, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, शहराध्यक्ष विशाल साळवे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com