व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करा : डॉ. कापडणीस

व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करा : डॉ. कापडणीस

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

वाईट गोष्टींचे व्यसन (addiction) हे आपले जीवन उध्वस्त करण्याबरोबर स्वत:सह कुटूंब व समाजाचे स्वास्थ बिघडवणारे ठरत असते.

त्यामुळे शालेय जीवनापासूनच व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने (students) केला पाहिजे. यासाठी अध्यात्मिक साधनेची जोड दिल्यास मनाची शक्ती वाढण्याबरोबर आपला संकल्प सिध्दीस नेण्यास देखील निश्चित मदत होत असल्याचे प्रतिपादन हृदयरोगतज्ञ डॉ. उज्वल कापडणीस (Cardiologist Dr. Ujwal Kapadnis) यांनी येथे बोलतांना केले.

‘माझी शाळा-तंबाखूमुक्त शाळा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने वर्धमान शिक्षण संस्था संचलित र.वी. शाह विद्यालयात व्यसनमुक्तीवर जनजागृती (Public awareness on de-addiction) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना हृदयरोगतज्ञ डॉ. उज्वल कापडणीस बोलत होते. व्यासपिठावर संस्था सहसचिव गौतम शाह, डॉ. मनिषा कापडणीस, चंद्रकांत खैरनार, प्राचार्य व्ही.एन. कासार, पर्यवेक्षिका एस.एस. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळा सभागृहात आयोजित कार्यक्रमात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना (students) व्यसन (addiction) म्हणजे काय तसेच बदलत्या काळात विद्यार्थी दशेत मुले कशी व्यसनाकडे वळतात व या व्यसनापासून त्यांनी कसे वाचावे. विशेषत: कुटूंबातील पालकांना व्यसनाधिनतेपासून कसे परावृत्त करावे या संदर्भात डॉ. उज्वल कापडणीस, डॉ. मनिषा कापडणीस यांनी सखोल मार्गदर्शन केले.

व्यसनांमुळे आपले जीवन कसे उध्वस्त होते व त्यामुळे स्वत:बरोबर कुटूंब व समाजाचे स्वास्थ कसे बिघडते या संदर्भात माहिती देत डॉ. कापडणीस पुढे म्हणाले, व्यसनांंचे दुष्पपरिणाम (Side Effects of Addictions) तुमचे जीवन उध्वस्त होतेच परंतू कुटूंब व समाजाचे स्वास्थ देखील चांगले राहते. व्यसनाच्या अतिरेकाने अनेक कुटूंबे उध्वस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यामुळे शालेय जीवनापासूनच अशा व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प (Resolve to stay away from addictions) विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे आवाहन डॉ. कापडणीस यांनी शेवटी बोलतांना केले. संस्था सहसचिव गौतम शाह यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रजापिता ब्रम्हकुमारीतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयातर्फे व्यसनमुक्ती विषयावर मनोरंजनातून प्रबोधन करणारी नाटिका सादर केली गेली.

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यसन न करण्याची शपथ घेतली. प्राचार्य कासार यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविकात पालक सभेदरम्यान व्यसनमुक्तीवर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एल. फडके यांनी तर पर्यवेक्षिका देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com