ग्रामविकासाचा संकल्प करा: कोतवाल

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायतीच्या (gram panchayat) चुरशीच्या निवडणुका (election) पार पडल्या. गाव सर्वांचे आहे आणि आपण सर्वजण गावाचे आहोत.

या भूमिकेतून किमान जिरवा जिरवीच्या सत्तासंघर्षाच्या साठमारीत न अडकता सरकारच्या कल्याणकारी योजना (welfare scheme) नवनिर्वाचित सरपंचांनी (sarpancha) व सदस्यांनी संकल्प करून ग्रामविकासाचा संकल्प (village development) धरावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल (Namdev Kotwal) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका (election) अटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत पार पडल्या. वर्षानुवर्ष पारंपरिक संघर्ष असलेल्या गावांतील दोन गटांत या निवडणुका पार पाडल्या गेल्या. तालुक्याच्या राजकारणात राजकीय पक्ष (political party) हे नेहमी गौण ठरत असल्याचा इतिहास असल्याने येथे कोणता पक्ष जिंकला यापेक्षा कुठल्या गटाने बाजी मारली असा राजकीय संघर्ष कायम राहिला आहे.

यंदा प्रथमच सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा कायदा शिंदे-फडणवीस सरकारने केल्याने निवडून आलेल्या सरपंचांमध्ये युवकांचा भरणा अधिक राहिला आहे. त्यातच 15 व्या वित्त आयोगाने ग्रामपंचायतींना विशेष अधिकार बहाल केले आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढे अधिकार मिळाल्याने ग्रामस्तरावर राजकीय संघर्ष व कमालीची राजकीय इर्षा तरुणांमध्ये दिसुन आली.

कोरोनामुळे (corona) गावबंदी करणारे गांव पुढारी मतदानासाठी (voting) गावाला येण्यासाठी गाड्या पाठवत होते. हेही दृश्य अनेक ठिकाणी पहायला मिळाले. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातुन गावाचा विकास होऊ शकतो. ग्रामस्वच्छता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचे नियोजन करून गावांची वाटचाल आदर्श गावाकडे होऊ शकते.

नूतन सरपंच हा गावाचा कुटुंबप्रमुख म्हणुन ओळखला जातो. जिज्ञासू वृत्तीने ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती करून घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम करावे. निवडणुका आता पार पडल्या असल्या तरी गावांतील गट-तट हेवेदावे विसरून आता ग्रामविकासाकडे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी लक्ष केंद्रित करावे, असा आशावादही कोतवाल यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com