वनराई बंधारा मोहिमेचा संकल्प पूर्ण

वनराई बंधारा मोहिमेचा संकल्प पूर्ण

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी ,फक्त एक धाव पाण्यासाठ, तसेच श्रमदान (Shramdan) हेच सर्वश्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य घेऊन जलपरिषदेने (Water Council) पेठ (peth), सुरगाणा (surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तसेच दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) गाव तेथे वनराई बंधारा मोहीम (Vanrai Bandhara) हाती घेतली होती. त्या मोहिमेला ग्रामस्थांनी श्रमदानातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने 201 वनराई बंधारा मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

जलपरिषदेने गाव तेथे वनराई बंधारा मोहीमेचा शुभारंभ नोव्हेंबर महिन्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्लक्षित अशा अतिदुर्गम भागातील जांबूनपाडा येथून करण्यात आला होता. 201 वनराई बंधार्‍यांचे डोळ्यासमोर संकल्प ठेवून ग्रामस्थांच्या श्रमदानातून यशस्वीपणे पूर्णही करण्यात आले. पेठ, सुरगाणा, तसेच दिंडोरी तालुक्यात या मोहिमेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने गेल्या वर्षीच्या 101 वनराई बंधार्‍याच्या संकल्पपुर्तीत यावर्षी 201 वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प ठेवण्यात आला होता.

दोनच महिन्यात ठेवलेल्या उद्दिष्ट्येस ग्रामस्थांनी भरभरून श्रमदान करत 207 वनराई बंधार्‍यांची निर्मिती केली आहे.यामुळे बांधलेले वनराई वनराई बंधारे आजही तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याने भूजल पातळीबरोबर निर्माण होणार्‍या पाणीटंचाई मात झाली आहे. रिकाम्या गोण्यात माती टाकून वाहून जाणारे पाणी अडविण्यात येत असल्याने अधिकच ग्रामस्थांना, जनावरे, पशु पक्ष्यांना तसेच वापरासाठी उपयुक्त ठरले आहे. त्याच बरोबर अनेक गावांना हे वनराई बंधारे दशक्रिया विधी, शेतीसाठी लाभदायक ठरत आहेत.

उन्हाळ्यात भेडसावणार्‍या पाणीटंचाईवर काही प्रमाणात का होईना वनराई बंधार्‍यांच्या माध्यमातून मात झाली आहे. अनेक ठिकाणी शासनाच्या कल्याणकारी पाणी पुरवठा करणार्‍या विहिरींना दिलासा मिळाला असून वनराई बंधारा जीवनदान ठरला आहे. यावेळी मार्गदर्शक देविदास कामडी, वन परिमंडळ अधिकारी नवनाथ गांगुर्डे, जलदूत नितीन गांगुर्डे, खंडेराव डावरे, अनिल बोरसे, पोपट महाले, देवचंद महाले, अशोक तांदळे, रतन चौधरी, हिरामण चौधरी, योगेश महाले, दिलीप महाले, अंकुश मोरे,

नामदेव पाडवी, मनीषा घांगळे, नेताजी गावीत, अनिल गाडर, ग्रामसेविका अलका तरवारे, हंसराज भोये, सरपंच हरी खाडम, उपसरपंच धीरज पागी ,लहूदास पागी, कैलास निंबारे, बापू कोंगील, एकनाथ पागी, सोमनाथ पागी, रमण निंबारे, नामदेव पागी, वसंत पागी, संदीप पागी, रोशन पागी, विठ्ठल पागी, नवसु पागी, अंबादास पागी, गणेश पागी, कौशल्या करपट, प्रमिला पागी, गंगुबाई बरफ, मुळीबाई पागी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com