खेरवाडीत ‘हरित ग्राम’ चा संकल्प

खेरवाडीत ‘हरित ग्राम’ चा संकल्प

चांदोरी । वार्ताहर Chandori

खेरवाडी ग्रामपंचायतीचे ( Khervadi Grampanchayat ) सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत त्याऐवजी मोठ्या प्रमाणात वृक्षांची रोपे आणून गावात मोकळ्या जागेत मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण केले. तसेच वृक्षांच्या संरक्षणासाठी जाळ्या देखील बसविल्या असून वृक्षरोपणातून ‘हरित ग्राम’ करण्याचा संकल्प व्यक्त केला.

खेरवाडी येथील प्राथमिक, माध्यमिक शाळेसह ग्रामपंचायत, सोसायटी परिसर याबरोबरच अंगणवाडी व गावातील मोकळ्या जागेसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे.

या वृक्षारोपण प्रसंगी बाबाजी संगमनेरे, योगेश हंडोरे, दिलीप संगमनेरे, रोहिदास संगमनेरे, संजय आवारे, कैलास संगमनेरे, अंगणवाडी सेविका मीरा आवारे, सुरेखा पवार, लहानु संगमनेरे, गोरख संगमनेरे, नंदलाल संगमनेरे, भाऊसाहेब निपुंगळे, सोमनाथ पीठे, दिलीप संगमनेरे, शुभम जाधव आदींसह खेरवाडी परिसरातील ग्रामस्थ, महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी व तरूण उपस्थित होते.

यापूर्वी देखील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्मशानभूमी दुरुस्त करत या परिसरात वृक्षारोपण करीत संरक्षक जाळ्या बसविल्या होत्या. तर आता जि.प. शाळा, माध्यमिक विद्यालय यासह गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून ‘हरित ग्राम’ क्रांतीचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com