अमृतमहोत्सवी वर्षात 75 कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प : डॉ. मालपाणी

अमृतमहोत्सवी वर्षात 75 कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प : डॉ. मालपाणी

संगमनेर । दि. 7 प्रतिनिधी Sangamner - Sinnar

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त (Amritmahotsavi Independence Day) 75 कोटी सूर्यनमस्कार (suryanamaskar) घालण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या (students) मनात राष्ट्र चेतना जागवणार्‍या या ऐतिहासिक उपक्रमात देशातील सुमारे 30 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांसह एकूण 30 लाखांहून अधिक योगप्रेमी (yoga) सहभागी होणार आहेत.

या उपक्रमात शाळा (school), समूह अथवा व्यक्तिगत स्वरुपातही सहभागी व्हावे असे आवाहन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष (National President) आणि राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनचे (National Yogasana Sports Federation) उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी (Vice President Dr. Sanjay Malpani) यांनी केले.

गुरुवारी (ता.2) हरिद्वार (Haridwar) येथील पतंजली (Patanjali) योगपीठात नावनोंदणी प्रक्रियेचा (Registration process) शुभारंभ झाला. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan), योगमहर्षी स्वामी रामदेव (Yoga Maharshi Swami Ramdev), आचार्य बालकृष्ण (Acharya Balakrishna), डॉ.जयदीप आर्य (Dr. Jaydeep Arya) आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या क्षणाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्व कल्याणासाठी जगाला योगविद्या (Yoga) देणार्‍या भारतात योगाच्या प्रति विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करण्यासाठी गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्ट फुलनेस संस्था व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या पाच संस्थांनी संयुक्तपणे 75 कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमाला पुढील वर्षी 1 जानेवारीपासून सुरुवात होणार असून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. भारत सरकारच्या आयुष आणि खेल मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य प्राप्त होणार्‍या या उपक्रमात वरील कालावधीत सहभागी योगप्रेमींना दररोज 13 सूर्यनमस्कार घालावे लागतील. विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून व अन्य योगप्रेमींना व्यक्तिगत स्वरुपातही नोंदणी करुन या उपक्रमात सहभागी होता येईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com