पंचायत राज दिनी शाश्वत विकासाचा संकल्प

पंचायत राज दिनी शाश्वत विकासाचा संकल्प
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीचे रक्षण (Protecting the Earth) करणे आणि 2030 पर्यंत सर्व नागरिकांना शांतता व समृध्दी प्राप्त करून देणे,

यासाठी पंचायत राज संस्था (Panchayat Raj Sanstha) कटिबध्द असून रविवारी (दि.24) प्रत्येक ग्रामपंचायत (Gram Panchayat) शाश्वत विकासाचा संकल्प (Resolution for sustainable development) सोडणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या (central government) व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड (Vibrant Gram Sabha Portal Dashboard) वर याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (National Gram Swaraj Abhiyan) अंतर्गत केंद्र शासनाने नव्याने सुधारणा केली आहे. त्यानुसार सन 2022-2023 पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाने जी ध्येये निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या 17 पैकी 9 संकल्पना, विषय केंद्र शासनाने (central government) निश्चित केल्या आहेत. रविवार दि.24 एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून 9 पैकी किमान 1 व जास्तीत जास्त 3 संकल्पनाची निवडाव्यात. त्या दृष्टीने काम करण्याचा शपथपूर्वक संकल्प करावा आणि निवडलेल्या संकल्पनांची माहिती व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड (Vibrant Gram Sabha Portal Dashboard) येथे ऑनलाईन (online) पध्दतीने सादर करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रशासक लीना बनसोड (Instructions Zilla Parishad Administrator Lina Bansod) यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिले होते. यावर कार्यवाही करत जिल्ह्यातील 1384 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका ही व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड येथे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आली असून ग्रामसभा झाल्यानंतर त्याचा अहवाल देखील या पोर्टलवर टाकला जाणार आहे.

अशा आहेत संकल्पना

1)गरिबी मुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृध्दीस पोषक गाव. 2) आरोग्यदायी गाव 3)बालस्नेही गाव 4)जल समृध्द गाव 5)स्वच्छ आणि हरित गाव 6)पायाभूत सुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव 7)सामाजिक दृष्टया सुरक्षित गाव 8)सुशासन युक्त गाव 9)लिंग समभाव पोषक गाव

ग्रामसभांच्या परिणामकारक संचालनासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतील उपक्रमांची माहिती व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड येथे ऑनलाईन पध्दतीने अद्ययावत करावी व शाश्वत विकासाच्या संकल्प ठरावाबरोबरच आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी देखील ग्रामसभेत सहभागी व्हावे.

- लीना बनसोड, प्रशासक, जिल्हा परिषद नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com