पाथर्डी, इंदिरानगर रहिवाशांचा पाणीपुरवठा विभागाला अल्टीमेटम

पाथर्डी, इंदिरानगर रहिवाशांचा पाणीपुरवठा विभागाला अल्टीमेटम

इंदिरानगर | वार्ताहर

पाथर्डी व इंदिरानगर परिसरात (Pathardi and Indiranagar area) पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला असून माजी नगरसेवकांनी दिलेल्या सूचना व आंदोलनाची दखल ही प्रशासनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी माहिती कायदा अधिकाऱ्याकडे जाऊन पाणी प्रश्नाची कैफियत मांडावी लागत असून पाणी प्रश्नी २०१६ च्या आंदोलनाची (agitation) पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे...

प्रभाग क्रमांक ३१ निसर्ग रो हाऊस जे डी सावंत कॉलेज जवळ असलेल्या शंभरहून अधिक घरांमध्ये पाणी प्रश्न बिकट बनला आहे. वर्षभरापासून येथील रहिवाशी पाणीपुरवठा विभागाकडे (Water Supply Department) व माजी नगरसेवकांकडे सातत्याने पाणी येत नसल्याच्या तक्रारी करत असूनही पाणीपुरवठा विभागाकडून त्याची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही.

सहा महिन्यापूर्वीच माजी नगरसेवकांनीही याबाबतीत नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. परंतु, त्यानंतरही पाणी प्रश्न सुटलेला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले .करंगळी सारखी पाण्याची (Water) धार काही मिनिटे येते व पाणी बंद होते. यामुळे रहिवाशांना जवळपासच्या बोरवेलचा सहारा घ्यावा लागत असून कधी खाजगी टॅंकरने पाणीपुरवठा करून पाण्याची तहान भागवावी लागत आहे.

याबाबतीतचा प्रश्न सुटत नसल्याने येथील शंभर कुटुंबीयांच्यावर असलेल्या रहिवाशांनी (Residents) माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्याबाबतीत मनपा प्रशासनाकडे दाद मागितली आहे .तर गायकवाड यांनीही परिसरातील नागरिकांवर कर भरूनही होत असलेल्या अन्यायाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास २०१६ च्या आंदोलनाची आठवण करून दिली आहे.

त्यामुळे प्रशासन याला दाद देते किंवा नाही ते येणाऱ्या आठ दिवसात समजेल. अन्यथा रहिवाशांनी महामार्गाखाली केलेल्या पाणी आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातील निवेदने नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहेत. दिलेल्या निवेदनावर १०० हून अधिक पुरुष महिलांच्या सह्या आहेत. पाणी प्रश्नाची परिस्थिती प्रभागात डोकेदुखी ठरत असून ठिकठिकाणी तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. तर मुकणे धरणाचे (Mukne Dam) पाणी येऊनही परिसरातील रहिवाशांना पुरेशे पाणी उपलब्ध होत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

मागील वर्षभरापासून पाणी प्रश्न बिकट बनला असून पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. कर भरूनही सुविधा मनपाकडून मिळत नसल्याने २०१६ ला केलेल्या आंदोलनाची वाट प्रशासन बघत आहे का? माजी नगरसेवकांची दखल ही प्रशासनाने घेतलेली नाही.

-अर्चना मुळे, रहिवाशी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com