
नाशिक | प्रतिनिधी Nashik
रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) दोन सहकारी बँकांंवर निर्बंध लादले आहेत. त्यात नशिकच्या गिरणा सहकारी बँकेचाही(Girna Cooperative Bank, Nahik) समावेश आहे. गिरणा सहकार बँकेच्या ग्राहकांना पुढील सहा महिने खात्यातून पैसे काढता येणाार नाहीत. गिरणा सहकार बँकेच्या 99.87 टक्के ठेवींचा विमा उतरवला असल्याचे रिझर्व्ह बँकेन म्हटले आहे.
यामुळे या ग्रााहकांची पाच लाखांपर्यंतची रक्कम विमा हमी कायद्याअंतर्गत परत केली जाईल. बँकांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत निर्बंध राहणार आहेत. म्हणजेच या बँकेंवर बंद असली तरी बँकेचे कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. ग्राहकांना बचत, चालू किंवा इतर खात्यांमधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
या कटु निर्णयाबद्दल नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे सचालक अजय ब्रम्हेचा यानी खेद व्यक्त केला आहे. सध्या रिझर्व्ह बँकेचे नियम अतीशय कडक झाले आहेत. त्यामुळे थोड्याही त्रुटी आढळल्या की कारवाई होते. त्याचा परीणाम इतर सहकारी बँकांवर होतो. त्यामुळे यापुढे खुप कळजी घेणे हाच पर्याय सध्या शिल्लक राहीला आहे. गिरणा बँकेशी संपर्क साधला असता त्यांंनी याबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे सांंगुन बँक लवकर पुर्वपदावर येईल, असे सांगितले .