<p>सिन्नर | Sinnar</p><p>तालुक्यातील सर्व 114 ग्रामपंचायतींच्या सन 2020 ते 2025 करीता सार्वत्रीक निवडणूका लवकरच होणार आहेत.</p> .<p>या सर्व गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार राहूल कोताडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.</p><p>तालुक्यातील सर्व 114 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पूढील एक-दोन महिण्यात होणार असून ग्रामपंचायतींचे आरक्षण त्यापूर्वी होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने या आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले असल्याचे कोताडे यांनी म्हटले आहे. आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कोताडे यांनी केले आहे.</p>