देवळा तालुका वि. प्र. l Deola

तालुक्यातील सर्व ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत आज दि. ५ रोजी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळा तहसील सभागृहात काढण्यात आली. त्यात २१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत महिलांसाठी राखीव झाली आहे.

देवळा तालुक्यात २२ ग्रामपंचायती अनुसूचित प्रवर्गातील असल्याने तेथील ११ ग्रामपंचायत सरपंचपद महिलांसाठी राखीव झाले असून बिगर आदिवासी प्रवर्गातील २० ग्रामपंचायतींपैकी १० ठिकाणी महिलांचे आरक्षण निघाले आहे.

बिगर आदिवासी प्रवर्गातील निघालेले आरक्षण असे,

सर्वसाधारण महिला - सांगवी, तिसगांव, कुंभार्डे, निंबोळा, डोंगरगाव, चिंचवे

सर्वसाधारण - उमराणे, लोहोणेर, गिरणारे, सरस्वतीवाडी, फुलेमाळवाडी, वऱ्हाळे,

इतर मागासवर्ग महिला - खालप, महालपाटणे, महात्मा फुलेंनागर

इतर मागासवर्ग - मेशी, वासोळ,

अनुसूचित जाती - फुलेनगर

अनुसूचित जमाती महिला - देवपूरपाडे

अनुसूचित जमाती - माळवाडी

अनुसूचित जमाती क्षेत्रातील २२ पैकी ११ ग्रामपंचायतीचे महिला राखीव सरपंच आरक्षण असे

विजयनगर, खुंटेवाडी, वाखारी, सावकी, वार्षी, कापशी, दहिवड, भऊर, वाजगाव, श्रीरामपूर, वरवंडी आदी

अनुसूचित जमाती - पिंपळगाव, शेरी, रामेश्वर, सुभाषनगर, खर्डे, खडकतळे, गुंजाळनगर, खामखेडा, मटाणे, विठेवाडी, कणकापूर आदी.