निफाड नगरपंचायतीच्या 17 प्रभागांचे आरक्षण जाहीर

निफाड नगरपंचायतीच्या 17 प्रभागांचे आरक्षण जाहीर

निफाड। प्रतिनिधी Niphad

निफाड नगरपंचायतीच्या (Niphad Nagar Panchayat) पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) अनु:जाती व जमाती साठी आरक्षण (Reservations) सोडत मागील महिन्यात काढण्यात आल्यानंतर उर्वरित 12 प्रभागांची आरक्षण सोडत

काल शुक्रवार दि.12 रोजी सकाळी 11 वाजता निफाड उपबाजार सभागृहात नगरपंचायतीच्या प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, मुख्याधिकारी डॉ.श्रीया देवचके यांचे उपस्थितीत अनुजा देवरे या विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठी द्वारे काढण्यात आली. आरक्षण सोडतीत अनेक मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना आता दुसर्‍या प्रभागातून नशिब अजमावे लागणार आहे.

आरक्षण सोडतीच्या प्रारंभी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ.श्रीया देवचके यांनी मागील 2015 मधील आरक्षणाची माहिती देवून यापूर्वी आरक्षित असलेल्या जागा वगळून आरक्षण काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तर महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने 17 पैकी 9 जागा महिलांसाठी आरक्षित केल्याचे सांगुन त्यानुसार चिठ्ठी प्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.

यात प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे. प्रभाग क्रं. 1 अनु जाती, प्रभाग क्रं.2 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.3 नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रं.4 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.5 अनु.जाती महिला, प्रभाग क्रं.6 अनु जमाती, प्रभाग क्रं.7 अनु जमाती महिला, प्रभाग क्रं.8 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.9 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.10 नागरिकांंचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रं.11 सर्वसाधारण,

प्रभाग क्रं.12 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.13 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रं.14 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.15 सर्वसाधारण, प्रभाग क्रं.16 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रं.17 अनु. जमाती महिला याप्रमाणे नगरपंचायतीसाठी आरक्षण निघाले असून यात शंकर वाघ यांचा प्रभाग क्रं.5, अनिल कुंदे यांचा प्रभाग क्र.10, मुकूंद होळकर यांचा प्रभाग क्रं.8, किरण कापसे यांचा प्रभाग क्रं.7,

राजाराम शेलार यांचा प्रभाग क्रं.13, आसिफ पठाण यांचा प्रभाग क्रं.1, स्वाती गाजरे यांचा प्रभाग क्रं.17 हे प्रभाग आरक्षित झाल्याने या नेत्यांना दुसर्‍या प्रभागातून नशिब अजमावावे लागणार आहे किंवा थांबावे लागणार आहे. तर नगरसेवक सुनीता कुंदे, देवदत्त कापसे, आनंद बिवालकर, नयना निकाळे, चारूशिला कर्डीले,

जावेद शेख, शिरिन मनियार या नगरसेवकांना किंवा त्यांचे कुटुंबियांना त्यांचे प्रभागातून पुन्हा नशिब अजमाविता येणार आहे. नविन आरक्षण सोडतीत अनु. जातीसाठी प्रभाग क्रं.5 व प्रभाग क्रं.1 हे राखीव झाले असून अनु.जमातीसाठी प्रभाग क्रं.7,6 व 17 हे आरक्षित आहेत. तर 17 जागांपैकी 9 जागा महिलासाठी राखीव असून राखीव महिला मध्ये अनु. जाती महिलेसाठी प्रभाग क्रं.5 तर अनु जमाती महिलेसाठी प्रभाग क्रं.7,17, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी

प्रभाग क्रं.10,13 तर सर्वसाधारण महिलासाठी प्रभाग क्रं.4,8,12,16 याप्रमाणे 9 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नगरपंचायतीचे आरक्षण सोडत जाहिर झाल्याने इच्छुक उमेद्वारांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला असून आपल्या प्रभागात जनसंपर्क वाढविला आहे. तर या आरक्षण सोडत विरोधात काहींनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com