देवतारी त्याला कोण मारी! तार कंपाऊंडमध्ये अडकलेल्या बगळ्याला जीवदान

देवतारी त्याला कोण मारी! तार कंपाऊंडमध्ये अडकलेल्या बगळ्याला जीवदान

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कोशिंबे (Koshimbe) येथे एका शेताच्या कडेला एक बगळा (Heron) तारेच्या वॉलकंपाऊडला अटकला होता....

यावेळी संदीप गोतरणे (Sandip Gotarne) हे या ठिकाणापासून जात असताना त्यांना बगळा तडफड करताना दिसला. त्यांनी त्या पक्षाला त्या वॉल कंपाऊंडच्या धारदार तारेतून सोडवले.

त्या पक्षाचा पाय पूर्णपणे रक्ताने भरलेला होता. यावेळी लगेचच लखमापूर (Lakhmapur) येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून त्यावर उपचार करण्यात आले. त्यांनतर अवनखेड येथे कादवा नदी (Kadwa River) तिरावर संदीप गोतरणे यांनी त्या पक्षाला सुखरूप सोडले. यावेळी चेतन पवार, बाळासाहेब कराटे, यांनीही सहकार्य केले. पक्षाला जीवदान दिल्यामुळे संदीप गोतरणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.