
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टि. जे. चौहाण (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी शाळेच्या मैदानावर नायलॉन मांजात (Nylon Manja) अडकून पारवा जखमी झाल्याची घटना घडली. ही बाब शिक्षकांच्या (Teachers) लक्षात येताच त्यांनी तात्काळ पारव्यास शाळेच्या सुरक्षित जागी आणले...
शाळेतील राष्ट्रीय हरित सेना व इको क्लबच्या विद्यार्थ्यांनीदेखील (Students) पारवाची देखभाल केली. वन्यजीव विभागाचे अधिकारी आनंद रेड्डी (Anand Reddy) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ इको-एको संस्थेचे अभिजित महाले (Abhijit Mahale) यांना पारवावर तत्काळ उपचार करावा असे सांगितले. यावेळी महाले म्हणाले की, या पक्षावर उपचार करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अहिरे, पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहाणकरी, प्रदीप ठाकरे, दिलीप मुठाळ, हरित सेनेचे प्रदीप सिंग पाटील, लता जाधव, सरला सोनवणे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.