नायलॉन मांजात अडकला पक्षी; अथक प्रयत्नाअंती जीवदान

नायलॉन मांजात अडकला पक्षी; अथक प्रयत्नाअंती जीवदान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मकरसंक्रांतीच्या (Makarsankranti) दिवशी सगळीकडे पतंग (Kite) उडविण्याचा उत्साह सुरु असतानाच नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर झाल्याने मते नर्सरी परिसरात (Mate Nursery) एक पक्षी (Bird) नायलॉन मांजात अडकला होता...

एका झाडावर अडकलेल्या अवस्थेत जखमी पक्षी नागरिक भाऊराव सानप (Bhaurao Sanap) यांना दिसून आला. त्यांनी तत्काळ पक्षीमित्र मिलिंद वाव्हळ (Milind Vavhal) यांना माहिती दिली.

त्यांनी घटनास्थळी दाखल होत अग्निशामक दलाला फोन करत मदत मागवली. अग्निशामक दलानेही घटनास्थळी पोहचून जखमी पक्षाला खाली उतरवून नायलॉन मांजातून त्याची सुटका केली. जखमेच्या ठिकाणी उपचार करत त्या पक्षाला जीवनदान मिळाले.

शहरात पोलीस (Police) तसेच काही सामाजिक संघटना यांनी नायलॉन मांजा वापरू नये यासाठी वेळोवेळी प्रबोधन करण्यात आले. सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातूनदेखील जनजागृती (Awareness) करण्यात आले. तरीदेखील काही समाजकंटकांमुळे नागरिक तसेच पक्षांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे,

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com