मांजात अडकलेल्या कावळ्याला 'असे' मिळाले जीवदान

मांजात अडकलेल्या कावळ्याला 'असे' मिळाले जीवदान

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

गांधीनगर (Gandhinagar) येथील फुटबॉल मैदानातील पिंपळाच्या झाडावर मांजात (Manja) अडकलेल्या कावळ्याला (Crow) नगरसेवक अनिल ताजनपुरे (Anil Tajanpure) यांनी अग्निशमन दल (Fire brigade) व नागरिकांच्या मदतीने जीवदान दिले...

कावळा मांजात अडकल्याचे सचिनदेव गायकवाड, शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोरे, हेमंत शेजवळ, साहेबराव ढवळे, आकाश बियाणी, नागेश वंजारे, राहुल महाजन, योगेश पठारे या नागरिकांनी ताजनपुरे यांना कळवले.

ताजनपुरे यांनी नाशिकरोडच्या महापालिका विभागीय कार्यालयाला कळवले. उद्यान विभागाचे कर्मचारी दत्तू महाले, दिनकर गाडेकर, संदिप भुजगुडे, सुनिल कोरडे, रविंद्र जाधव, अग्नीशमन दलाचे फायरमन आर. बी. आहेर, एम. के. साळवे, आर.आर. काळे, ए. के. मांडे, वाहनचालक जी. के. तेजाळे हे दाखल झाले.

मांजात अडकल्यामुळे कावळा मोठ्याने आवाज व सुटण्यासाठी धडपड करत होता. अग्निशमन दलाने यांत्रिक शिडीच्या सहाय्याने तर नागरिकांनी शेजारील इमारतीच्या गच्चीवर जाऊन कावळ्याची सुटका केली. मांजामुळे कावळा जखमी झाला असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com