किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांंची सुटका

किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांंची सुटका

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

सुप्रसिद्ध हरिहर किल्ल्यावर ( Harihar Fort ) मालेगाव येथील चार पर्यटक डोंगरावरील धुक्यात वाट चुकल्यामुळे अडकून पडले होते. या चार पर्यटकांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले. पर्यटकांची सुटका करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस, वनविभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी , संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांनी प्रयत्न केले.

पर्यटक वाट चुकल्याची खबर प्रशासनाला मिळाली. संयुक्त मोहीम राबवत रात्री बाराचे सुमारास पर्यटकांना खाली आणले. सुखरूप परतलेल्या पर्यटकांनी अधिकार्‍यांचे आभार मानले,असे कार्यकर्ते नामदेव बुरंगे यांनी सांगितले.

पर्यटकाना मार्गदर्शनाचा अभाव

हरिहर किल्ला हा घनदाट जंगलामध्ये व चढण्यासाठी अत्यंत अवघड दुर्गम किल्ला आहे . कच्चा रस्ता पायवाट व दोनशे दुर्गम पायर्‍या आहेत. त्यामुळे रात्री उशिरा पर्यटक जर किल्ल्यावर गेले तर त्यांना परतीचा मार्ग सापडत नाही त्यामुळे वन विभागाने सायंकाळी चार नंतर वरील ठिकाणी कोणीही जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सूचना फलक लावावे, पर्यटकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com