देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

भर दुपारी देवीमंदिर जवळील नानेगाव रोडवरील केंद्रीय विद्यालयाजवळ दोघा कोब्रा जातीच्या सर्पांमध्ये झुंज चालू होती. दोघेही जखमी होत असताना सर्पमित्र मंगेश परदेशी यांनी रेस्क्यू करीत दोन्ही सर्पांना वेगवेगळे करीत त्यांचे प्राण वाचविले.

केंद्रीय विद्यालया शेजारच्या भिंती लगत दोन सर्प एकमेकांशी झुंजत असल्याचे नागरिकांनी बघितले. अनेक लोक जमा झाले मात्र सर्प त्यांच्याच तालात झुंजत होते. यात लांबीने कमी असलेला सर्प जखमी होत होता.

यावेळी उपस्थित असलेले अर्जुन संगमनेरे यांनी सदर घटना ताबडतोब सर्पमित्र मंगेश परदेशी यांना कळविली. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्पामधील झुंज सोडवण्यासाठी त्यांनी रेस्क्यू करीत त्यांना एकमेकांपासून दूर केले व नंतर दोघाना सुरक्षित स्थळी सोडून दिले.

मुक्या प्राण्यांना जीवदान देऊन मंगेश परदेशी यांनी चांगले काम केले. याबद्दल त्यांचा उपस्थित नागरिक तसेच ओम साईराम मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.