आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर प्रजासत्ताकदिन उत्साहात

आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर 
प्रजासत्ताकदिन उत्साहात

नाशिक | प्रतिनिधी

मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड नाशिक २ या शाळेत ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला...

कार्यक्रमासाठी शालेय समिती सदस्य डॉ अशोक देवरे, हरिश्चंद्र मोराडे, शिक्षक पालक उपाध्यक्ष मंगेश बिरारी, सदस्य दीपक हांडगे, दत्तात्रय गाडे, विवेक कदम, अर्चना सूर्यवंशी, सुलोचना हिरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कैलास चोळके, दीपाली वाघ, माता पालक सदस्य सुषमा पारिक, विशाखा समिती सदस्य सुनिता वाघ, माजी मुख्याध्यापक व्ही.के.भामरे व कोरोना योद्धा प्रवीण वाघ, पालक वर्ग, विविध वेशभूषेतील विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी, वैशाली देवरे, जेष्ठ शिक्षिका ज्योती पवार, उज्ज्वला पवार, अर्चना वाळके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले व कोरोना योद्धा प्रवीण वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व ध्वजप्रतिज्ञा घेण्यात आली.

मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी व शिक्षक यांनी "उष:काल होता होता काळरात्र झाली" हे समूहगीत सादर केले.

तसेच उपस्थित विद्यार्थ्यांपैकी मॉटेसरीचे आराध्या काळे, शिव देवरे, आरोही गांगुर्डे तसेच इ. १ ली चे आद्यावंश गुंडेकर, शताक्षी वडजे, २ री चा उज्ज्वल चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात भाषणे केली.

कोरोना योध्या प्रवीण वाघ यांनी कोरोना काळातील काही अनुभव सांगितले. शाळेतील उपशिक्षिका मंगला गुळे यांनी गणतंत्रदिनाची सविस्तर अशी माहिती सांगितली. व उपशिक्षिका सुवर्णा गोस्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com