त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

Nashik | Nashik

त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.के.शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वज़ारोहण संपन्न झाले.

या प्रसंगी विद्यार्थी विकास समितीचे कैलास घुले, उल्हासदाजी आराधी, शालेय समितीचे मधुकर कडलग, मुख्याध्यापक धोंडगे, चौधरी, दिलीप मुळाणे, वसंतराव भोसले मान्यवर उपस्थितीत होते.

या सोहळ्यास शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संविधान उद्देशिका वाचन प्रा. नरेंद्र निकम यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com