Corona
Corona
नाशिक

उमराणे : मृत कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील ९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

उमराणे | Umrane वार्ताहर

दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह निघालेल्या उमराणे येथील मृत कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील ९ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये २४ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, १९ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलगा, ३४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तसेच देवळा शहरातील ७६ वर्षीय पुरुष व दहिवड येथील २५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हा युवक रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असून तो आपल्या गावी येत असताना त्याला नाशिक येथे क्वांरटाईन करण्यात आले होते. त्यामुळे आज तालुक्यात ११ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. अशी माहिती डॉ. मांडगे यांनी दिली आहे.

९ पॉझिटिव्ह आल्यामुळे उमराणे ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली असून आज सायंकाळी तहसीलदार शेजवळ, गटविकास अधिकारी देशमुख, कृषी अधिकारी पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, तालुका पोलीस निरीक्षक मातोंडकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव शिरसाठ, उपसभापती धर्मा देवरे, माजी सभापती विलास देवरे, तालुका पोलीस यांनी प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली असून गावात कोरोनाचा प्रसार वाढू नये ह्यासाठी काय उपाय योजना करता येतील चर्चा करण्यात आली असून मंगळवारी निर्णय घेण्यात येणार आहे.

गाव आठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळते, ग्रामस्थांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप असल्यास त्वरित ग्रामपंचायत किंवा ग्रामीण रुग्णालयाला कळवावे. लवकर उपचार घेतल्यास लवकर कोरोना बरा होतो. असे आवाहन सरपंच लताबाई देवरे यांनी केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com