नाशकात आज करोनाची 'फिफ्टी'

नाशकात आज करोनाची 'फिफ्टी'
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ५० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ५४ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ५० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या १६ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ३१, मालेगाव ००, तर जिल्हाबाह्य ०३ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ग्रामीण भागातील ०१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६४८ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.