दिंडोरी : 28 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह
दिंडोरी : 28 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह
नाशिक

दिंडोरी : 28 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

Nitin Gangurde

दिंडोरी । Dindori (प्रतिनिधी)

दिंडोरी तालुक्यात सुमारे 250च्या पुढे रुग्ण गेले असून धुमाळ कंपनीत 3 ते 4 रुग्ण सापडले आहे. कालही 32 वर्षीय कामगाराला करोनाची लागण झाली. बोपेगाव कोव्हिड सेंटरमधुन 28 रुग्णांचे अहवाल पाठविण्यात आले होते. परंतु ते सर्व निगेटिव्ह आले आहे.

पिंपरखेड येथे 55 वर्षीय पुरुषाला आणि 32 वर्षीय स्त्रीला करोनाची लागण झाली आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच करोनाचा रुग्ण आढळल्याने परिसरात खबरदारीची उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे.

कसबे वणी येथे अल्पसंख्याक गल्लीत 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला लागण झाली आहे. एकदरीत करोनाची एकुण रुग्ण संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्येने उंच्चाक गाठला आहे.

अनेक औद्योगिक वसाहतीत रुग्ण वाढल्याने ग्रामीण भागातही त्याचा प्रचार-प्रसार वेगाने होत चालला आहे. दिंडोरी तालुका राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने लक्ष देऊन कंपन्यांमध्ये कडक उपाययोजना कराव्यात. काही कंपन्यांवर कारवाई झाली आहे. परंतु अनेक कंपन्यांवर कारवाई होणे बाकी आहे.

नाशिक येथे मयत रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्ण यांची माहितीही अनेक कंपन्यांनी लपवल्याची चर्चा आहे. कामगार जगतात, काही व्यवस्थापना बाबत संतापही आहे. त्यामुळे प्रशासनाने तळागाळाशी जावून माहिती घ्यावी व आपले कर्तृत्व पार पाडावे, अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेशी आहे. कंपनी व्यवस्थापन शासकीय अधिकार्‍यांचा आदेश धुडकावून लावत असल्याचे काही घटनावरुन दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com