वासाळी भ्रष्टाचारप्रकरणी महसूल आयुक्तांंना अहवाल

वासाळी भ्रष्टाचारप्रकरणी महसूल आयुक्तांंना अहवाल

इगतपुरी । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील Igatpuri Taluka वासाळी ग्रामपंचायत सरपंच Vasali Grampanchayat Sarpanch , ग्रामसेवकांंच्या चार वर्षांपासून कथित अपहारप्रकरणी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींवर दोनदा चौकशीचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांनी अपहार केल्याचा ठपका ठेवत अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अखेर ग्रामसेवक निलेश चव्हाण यांचे निलंबन केले. तसेच सरपंच काशिनाथ कोरडे यांच्यावर कलम 39 अन्वये कारवाईसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशीत सरपंच काशिनाथ कोरडे व ग्रामसेवक निलेश चव्हाण यांनी गेल्या चार वर्षांत एकाही कामाचे टेंडर केले नाही, अंदाजपत्रक तसेच मूल्यांकनही केले नाही त्याच प्रमाणे कामे न करताच मोठया रकमांचे धनादेश काढून अपहार, सदस्यांच्या नावे धनादेश काढून संगनमताने निधी अपहार करणे, रेखांकित धनादेश देण्याऐवजी बेअर धनादेशद्वारे व्यवहार करणे, प्रामुख्याने वृक्षारोपण, शाळा वर्ग खोली दुरुस्ती, पाणीपुरवठा अनुषंघिक कामे, गटार, रस्ते, पोलीस चौकी, सपाटीकरण, गावातील स्वच्छता मोहीम या बाबींमध्ये अपहार झाल्याचे अहवालात उल्लेख आहे. त्याच प्रमाणे अनेक कामे ही एनजीओ व कंपनी सीएसआर फंडातून केलेली असताना ग्रामपंचायतने केल्याचे दाखवून निधी अपहार केल्याचे दिसून आले होते.

वासाळी एकमेव ग्रामपंचायत असेल ज्यात बेअरर धनादेशद्वारे निधी काढून घरचे पैसे असल्यासारखे खर्च केले आहेत. सरपंच काशिनाथ कोरडे व ग्रामसेवक यांनी अपहार केलेला निधी वसूल होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

- दौलत कोरडे, ग्रामस्थ, वासाळी

आदिवासी सरपंच जर आदिवासींसाठी आलेला निधी हडप करीत असेल तर प्रशासकीय यंत्रणांना दोष देण्यात काय अर्थ, आदिवाशीच आदिवासींचे शोषण करीत आहे हे स्पष्ट होते हेच आदिवासी समाजाचे दुर्दैव आहे

- पांडुरंग कोरडे, सेवानिवृत्त तहसीलदार

Related Stories

No stories found.