आयआयटी सादर करणार अहवाल; 'या' व्यवस्थापनावर करणार मार्गदर्शन

आयआयटी सादर करणार अहवाल; 
'या' व्यवस्थापनावर करणार मार्गदर्शन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) माध्यमातून सातत्याने प्रयत्न करूनही शहरातून जाणार्‍या नासाडी व गोदावरीच्या (godavari) पाण्यामध्ये

नैसर्गिक नाल्यांच्या (natural drains) माध्यमातून किंवा गटारींच्या (sewers) माध्यमातून सांडपाणी (waste water) मिसळले जात आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्तांनी आयआयटी मुंबईला (IIT Mumbai) पाचरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) शहरातील नद्यांचे पाणी प्रदूषणापासून (Water pollution) मुक्त करण्यासाठी हयाती मुंबईला पाचरण केले आहे त्यांच्या माध्यमातून मुंबईचे दूषित पाणी (Contaminated water) पाणी स्वच्छ करून समुद्र सोडण्याचा प्रकल्प बनवला जात आहे ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Phulkundwar) यांनी नाशिक शहराच्या भावनांना जोडणार्‍या नदी प्रदूषणाच्या (river pollution) प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आयआयटी मुंबईला प्रचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने आयआयटी मुंबईला पत्र व्यवहारही करण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईच्या माध्यमातून या सांडपाण्यांचे नियोजन करणे, नदीत वाढणारे प्रदूषण रोखणे व नदीपात्रातील पाणी स्वच्छ व वाहते करण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल बनवला जाणार आहे. त्यामाध्यमातून शहराच्या ड्रेनेज यंत्रणेची क्षमता व अडचणींचा अभ्यासही या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे येणार्‍या संस्था पूर्वी सिंहस्थ पूर्वी गोदावरी व नासाडी दोनही नद्या स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाण्याची शक्यता आहे

शहरातून ड्रेनेज लाईनमधून नेले जाणारे प्रदूषित पाणी शुद्धीकरण करणार्‍या एसटीपी प्रकल्पांचे सक्षमीकरण करण्याची गरज असून,त्यातील दोन प्रकल्प नव्याने उभारलेलेे असल्यामुळे तेथे अद्ययावत यंत्रणा आहेत. तर उर्वरित एसटीपी प्रकल्पांना नवीन यंत्रणा उभारून त्यांचा सक्षमीकरण करण्याची गरज आहे त्या दृष्टीने ही महानगरपालिकेद्वारे विशेष नियोजनही केले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधीची मागरी करण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com