दीड महिन्यात साकारली त्रिरश्मी लेणीची प्रतिकृती

दीड महिन्यात साकारली त्रिरश्मी लेणीची प्रतिकृती

लेणीच्या प्रचार आणि प्रसारासाठी उपयोग

नाशिक | Nashik

नाशिकच्या त्रिरश्मी बुध्द लेणींची (Nashik Trirashmi Leni) प्रतिकृती अंबरनाथ (Ambarnath) येथील महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन संस्थेचे प्रभाकर जोगदंड (Prabhakar Jogdand) यांनी साकारली आहे.

निमित्त होते, एका संस्थेने बुद्ध लेणी प्रतिकृती बनवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जोगदंड यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी यासाठी नाशिकची प्रसिद्ध असलेली त्रिरश्मी बुध्द लेणींची निवड केली.

जोगदंड हे नोकरीस असल्याने त्यांनी वेळात वेळ काढून प्रतिकृती बनवली. रोज संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर साधारणपणे ४ ते ५ तास बसून काम करत असे. तर शनिवारी रविवार देखील पूर्ण दिवस त्यांनी यावर काम केले आहे. दरम्यान लॉकडाऊन (Lockdown) असल्याने अनेकदा साहित्य मिळण्यास अडचणी आल्या, त्यावेळी जवळच्या सहकाऱ्यांनी साहित्य उपलब्ध करून दिले. साधारण प्रतिकृती बनवण्यास त्यांना दीड महिना लागला.

अशी उभारली प्रतिकृती

सुरुवात चैत्यगुहा (Chaityagruh) पासून केली. त्यात एक इंच उंच जाडीच्या थर करून त्यात त्रिरश्मी लेणीत असलेल्या अष्टकोनी स्तंभाच्या संख्येइतकी म्हणजे समोरासमोर सहा सहा आणि स्तूपाच्या (Stup) मागे तीन अशी रचना केली. लेणीची उंची, स्तंभाची उंची, स्तुपाची उंची आणि इतर भाग भागांवर काम केले. अशाप्रकारे ५ फूट लांब व ३ उंच अशी त्रिरश्मी बुद्ध लेणी प्रतिकृती साकारली.

हे साहित्य वापरले

सिमेंट, रेती, दगड, माती, रिकामे बॉक्सेस, कापड, सनबोर्ड, एमसील, फेविकॉल, घरात असलेल्या लाकडी पट्टया पुठ्ठा, व्हाईट अर्का लिक रंग आणि इतर रंग.

अनेकदा शिल्पकला कार्यशाळांना (Sculpture Workshop) सहभाग घेतल्याने प्रतिकृती बनवण्यात मदत झाली. लेणी बनवण्यासाठी मुलगी ऋतुजा व ऋषभ ह्यांनी देखील खूप मदत केली. अशा अनेक लेण्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा मानस आहे. ज्यामुळे त्यामार्फत लेणीच्या प्रचार आणि प्रसारासाठी उपयोग होईल.

- प्रभाकर जोगदंड, लेणी अभ्यासक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com