दिव्यांगांचे मानधन बंद करणारा कायदा रद्द करा : डॉ. शेवाळे

दिव्यांगांचे मानधन बंद करणारा कायदा रद्द करा : डॉ. शेवाळे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

मुलगा कर्ता झाल्यावर दिव्यांग आई-वडिलांना संजय गांधी निराधार योजनेचे (Sanjay Gandhi Niradhar Yojana) मिळत असलेले मानधन (Remuneration) बंद करण्याचा शासनाचा कायदा दिव्यांगांवर (disabled) अन्याय करणारा ठरत आहे.

हा चुकीचा कायदा शासनाने त्वरित रद्द करावा. अन्यथा, या कायद्याच्या विरोधात मतभेद सर्वपक्षीय एकत्र येत आंदोलन (agitation) छेडतील अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Congress District President Tushar Shewale) यांनी येथे बोलताना दिली.

तालुका काँग्रेस कमिटीत (Taluka Congress Committee) सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सतीश पगार यांच्या वडिलांचे पुण्यतिथी निमित्त अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. बोलत होते. अपंग संघटना जिल्हाध्यक्ष मयूर पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रहार अपंग आंदोलन संघटनेचे नरेंद्र खैरनार राजेंद्र पवार, निंबा अहिरे आधी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

शहर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र (certificate) मिळवण्यासाठी तसेच संजय गांधी योजनेचे लाभार्थी असलेल्या निराधारांना मासिक वेतनासाठी येत असलेल्या अडचणीमुळे ते त्रस्त झाले आहेत अडचणी त्वरित दूर होण्यासंदर्भात आपण शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे शेवाळे यांनी शेवटी बोलताना सांगितले. या मेळाव्यात उपस्थित 50 दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप डॉ. शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

आगामी काळात दिव्यांग बांधवांना युनिट आयडी कार्डचे (Unit ID Card) वाटप केले जाणार आहे ज्यांना आयडी कार्ड मिळाले नसतील त्यांनी मयूर पाटील समाधान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे केले गेले उपस्थित मान्यवरांचे स्वागत सतीश पगार यांनी केले. मेळाव्यात दिवाळी फराळाचा आनंद दिव्यांग व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित घेतला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com