रस्ता दुरुस्ती करा अन्यथा मतदानावर बहिष्कार

रस्ता दुरुस्ती करा अन्यथा मतदानावर बहिष्कार

देवगाव । वार्ताहर | Devgaon

कोळगाव ते देवगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आगामी जिल्हा परिषद (zilha parishad) निवडणुकीवर (election) बहिष्कार टाकण्याचा इशारा कोळगावकरांनी गटविकास अधिकारी संदीप कराड (Group Development Officer Sandeep Karad) यांना दिलेल्या निवेदनात (memorandum) दिला आहे.

कोळगाव ग्रामस्थांनी 1916 रोजी जिल्हा परिषद सदस्य (Zilha Parishad Member), तहसीलदार (tahsildar), गटविकास अधिकारी (Group Development Officer), जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांकडे पाठपुरावा करून या रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. जिल्हा परिषदेकडून 1200 मीटर रस्ता खडीकरणासाठी तब्बल 12 लाख 50 हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र या रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे करण्यात आले.

त्यावेळी ग्रामस्थांनी नित्कृष्ठ होणार्‍या कामाबाबत संबंधितांना निवेदन (memorandum) दिले. मात्र त्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. परिणामी या रस्त्याची अवघ्या वर्षभरात अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सुमारे 400 ते 500 नागरिकांची ये-जा होत असते. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतमाल वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

पावसाळ्यात एखादा नागरिक आजारी पडल्यास त्याला देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) किंवा खासगी वैद्यकीय सेवा मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या रस्त्याचे त्वरीत नूतनीकरण न झाल्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा कोळगावच्या ग्रामस्थांनी निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना दिलेल्या निवेदनात (memorandum) दिला आहे.

अंनिसचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या निफाड तालुका उपाध्यक्षा शोभा जगताप, सुखदेव कांबळे, अजिंक्य जगताप, केदारनाथ घोटेकर, भास्कर घोटेकर, सागर घोटेकर, जितेंद्र घोटेकर, प्रशांत घोटेकर, वाल्मिक गवळी, विलास आहेर, विलास घोटेकर, अरुण वाघ, मधूकर घोटेकर, सुनील गवळी, बापूसाहेब घोटेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com