मिरवणूक मार्गांची दुरुस्ती करा : आयुक्त गोसावी

मनपा-पोलीस प्रशासन आढावा बैठकीत गणेशोत्सव नियोजन
मिरवणूक मार्गांची दुरुस्ती करा : आयुक्त गोसावी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा ( Ganesh Festival ) होणार असून त्यानिमित्त श्री मिरवणूक मार्गांसह (Procession routes)प्रमुख रस्त्यांची दुरूस्ती करण्यासह स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदीप व विशेषत: गणेशकुंडांवर सुविधांची कामे तत्परतेने करावीत. त्यासाठी आवश्यकतेनुसार वरिष्ठ अधिकारी व पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेत गणेशभक्तांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना मालेगाव मनपा आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी ( Malegaon Municipal Commissioner Bhalchandra Gosavi ) यांनी दिल्या.

आगामी गणेशोत्सवानिमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मनपाचे वरिष्ठ अधिकारी व शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांसह शांतता समिती सदस्यांच्या उपस्थितीत मनपा सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मनपा बांधकाम विभागाने शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी. मिरवणूक मार्गांची पाहणी करून रस्त्यावरील खाचखळगे बुजवावेत. विद्युत विभागाने मिरवणूक मार्ग तसेच सर्व विद्युत खांबांवरील ट्यूबलाईट, फोकस, बल्ब दुरुस्ती करून पथदीप सुरळीत ठेवावे. महादेवघाट व कॅम्प गणेशकुंडावर पथदीपांसह विद्युत रोषणाई करावी. मिरवणूक मार्ग व गणेशकुंडांच्या ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेर बसवावेत. स्वच्छता विभागाने शहरातील स्वच्छता अबाधित राखावी. जंतूनाशकांची फवारणी करावी. शहरात कुठेही कचरा दिसणार नाही, याची काळजी घ्यावी.

संबंधित मक्तेदारांना पत्र देऊन स्वच्छतेचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात यावी. पाणीपुरवठा विभागाने उत्सव काळात पाणीपुरवठा सुस्थित ठेवत मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक औषध साठा व कर्मचार्‍यांसह रुग्णवाहिका सुसज्ज ठेवावी. अग्निशमन विभागाने आपत्कालीन परिस्थितीत तसेच गणेशोत्सव कालावधीत आपली वाहने कर्मचार्‍यांसह तत्पर ठेवावीत आदी सूचना आयुक्त तथा प्रशासक गोसावी यांनी केल्या.

बैठकीस पो.नि. अशोक रत्नपारखी, दिगंबर भदाणे, संजय गायकवाड, सपोनि प्रकाश काळे, मनोज पवार, ज्ञानेश्वर बडगुजर, डी.ए. पाटील, उपनिरीक्षक यु.बी. मोहारे, मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले,तुषार आहेर, राजू खैरनार, अनिल पारखे, सुनील खडके,

आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, नगररचनाकार विश्वेश्वर देवरे, संजय जाधव, नगरसचिव साजिद अन्सारी, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, उपअभियंता शांताराम चौरे, जयपाल त्रिभुवन, सचिन माळवाळ, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, संकिर्णकर अधीक्षक सुनील खैरनार,

प्रभाग अधिकारी शाम बुरकूल, हरिश डिंबर, जगदीश बडगुजर, अ. कदिर अ. लतीफ, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख, अतिक्रमण अधीक्षक शाम कांबळे, उद्यान अधीक्षक नीलेश पाटील, वाहन विभागप्रमुख नानाजी गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक आंनदसिंग पाटील, एकबाल अहमद जान मोहम्मद, वरिष्ठ लिपीक कांता सोनवणे, आरेखक नजीर अहमद, शांतता समितीचे केवळ हिरे, भरत पाटील आदिंसह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com