स्वखर्चाने रस्त्याची दुरूस्ती

स्वखर्चाने रस्त्याची दुरूस्ती

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

मुंजवाड-डांगसौंदाणे (Munjwad-Dangsaundane) रस्त्याची खड्ड्यांमुळे (potholes) दुरवस्था झाली आहे. अशातच सततच्या पावसामुळे (heavy rain) रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

रस्ता दुरूस्तीसाठी (road repair) शासन निधीची (fund) वाट न पाहाता येथील सामाजिक कार्यकर्ते हरि जाधव यांनी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे (potholes) बुजवित वाहनचालकांना दिलासा दिला.

मुंजवाड-डांगसौंदाणे रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावर येणार्‍या सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी (farmers) वर्ग राहातो. दुध विक्रीपासून ते शेतीमाल विक्रीसाठी याच रस्त्यावरून सटाणा (satana) शहराकडे यावे लागते. गेल्या काही दिवसांत दुचाकी चालकांच्या अपघाताच्या (accidents) घटना वाढून त्यांना जायबंदी व्हावे लागले.

शेतकर्‍यांची ही दुर्दशा लक्षात घेत येथील सामाजिक कार्यकर्ते हरि जाधव व सहकार्‍यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून मुंजवाड-डांगसौंदाणे रस्त्यावर गावाच्या पश्चिम भागाकडून जाणारा रस्ता तसेच येथील गणपती मंदिराजवळील वळणावरील रस्त्यांवर असलेले खड्डे खडी व माती टाकून जेसीबीच्या सहाय्याने बुजविण्यात आले. जेसीबी, ट्रॅक्टर व खडीसाठी लागलेला सर्व खर्च जाधव यांनी केला.

शासनाच्या तुटपुंजी निधीवर होणारी रस्त्याची मलमपट्टी ही शेतकर्‍यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांपासून ग्रामस्थांसह शेतकर्‍यांचे प्राण वाचविण्यासाठी गावा गावातील सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी पुढे येऊन आपल्याच रस्त्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com