मातंग समाज अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करा

मातंग समाज अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज (Krantiveer Lahuji Salve Matang Samaj) अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करून शासन निर्णयात रुपांतरीत होण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने (Lokshahir Annabhau Sathe Social Organization) निवेदन देण्यात आले...

निवेदनात म्हंटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत बंद असलेले व्यावसायिक प्रशिक्षण चालू करून तरुण बेरोजगार युवकांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, स्व. बाळासाहेब गोपले यांनी मातंग समाजासाठी केलेली अ.ब.क.ड अशी स्वतंत्र आरक्षणाची मागणी पूर्ण करावी.

बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग इन्स्टिटयूटमध्ये हिंदु दलीत आरक्षण यादी (बार्टी) चर्मकार, खाटीक, वाल्मिकी व मातंग समाजाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह बांधून देते त्या वसतीगृहात हिंदू-दलित विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा, मागासवर्गीय महामंडळास ७ वा वेतन लागू करावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव (Bharat Jadhav) यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com