वृध्द कलाकार समितीची पुनर्रचना; 'इतक्या' अर्जाचा मार्ग खुला

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील वृध्द कलाकारांना (senior artists) समाजकल्याण विभागाच्यावतीने (Department of Social Welfare) मानधन (Remuneration) दिले जाते. सत्तातंर झाल्यानंतर या समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या.

पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या आदेशान्वये आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी लागणारी समितीची पुनर्रचना झाली असून समिती गठीत झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे (zilha parishad) प्राप्त झालेल्या 354 अर्जाचा मार्ग खुला झाला आहे. शासनाकडून दर महिन्याला वृध्द कलाकारांना श्रेणीनुसार मानधन (Remuneration) दिले जाते. मानधन देण्यासाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी पालकमंत्री समितीची जिल्हा परिषदेतून स्थापना करतात.

या समितीमध्ये अशासकीय अधिकार्‍यांचा समावेश असतो. मात्र राज्यात सत्तातंर झाल्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये राज्यभरातील सर्व निवड समिती रद्द करण्यात आली. पालकमंत्री (Guardian Minister) यांच्या नियुक्ती होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर या समितीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने (zilha parishad) या समितीची पुनर्रचना करत सदस्यांची नावे निश्चित करत ही यादी पालकमंत्री भुसे यांच्याकडे पाठविली.

भुसे यांनी यादीस मान्यता दिली. त्यामुळे अर्ज निवड समिती गठीत झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत वृद्ध कलाकारांकडून अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत समितीच्यावतीने अर्जाची छाननी होते. आलेल्या अर्जातून 100 कलाकारांची मानधनसाठी निवड केली जाते. पात्र लाभार्थ्यांची निवड करून शासनाकडे पाठविण्यात येतात.

त्यानंतर सांस्कृतिक संचालयन यांच्या मार्फत थेट लाभार्थ्याच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येतात. यंदा 377 कलाकारांनी मानधनासाठी अर्ज केला आहे. संबंधितांची अर्जाची छाननी केली असता, 23 अर्ज बाद झाले असून 354 अर्ज वैध झाले आहेत. या अर्जाची समितीमार्फत छाननी होईल. अ श्रेणीतील वृद्ध कलाकारांना दरमहा 3150 रुपये दिले जातात. तसेच व श्रेणीतील कलाकारांना 2700 रुपये आणि क श्रेणीतील कलाकारांना 2250 रुपये प्रमाणे मानधन मिळते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com