नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

आगर टाकळी येथे समर्थ रामदासांनी ४०० वर्षांपूर्वी नाशकतील आगरटाकळी येथे स्वतः स्थापीत केलेल्या प्रथम गोमय मारुतीच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी १४ वर्षापेक्षा जास्त काळ निवास केलेली गुहा आहे. सुमारे 400 वर्षांनंतर प्रथम गोमय मारुती या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे.

नाशकतील आ. प्रा. देवयानी फरांदे, प्रा. सुहास फरांदे यांचे तसेच शासन, देणगीदार, भक्त मंडळी यांचे या कार्यास मोलाचे सहकार्य झाले आहे.

या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. टी. पांडे यांचे अध्यक्षतेखाली, विश्वस्त सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, प्राचार्य राम कुलकर्णी, अँँड. भानुदास शौचे असे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे, दिवंगत विश्वस्त आर्कि प्रकाश पवार यांचेही या कामी मोठे सहकार्य लाभले आहे.

सोमवारी गोमय मारुतीचे मागील बाजूस मुर्ती ला संरक्षण म्हणुन असलेली व जुनी माती, चुना, दगड यात बांधकाम केलेली जाड भिंत आर्किटेकट राजवाडे व तांबट यांच्या उपस्थितीती व मार्गदर्शनाने, मजुरांचे सहाय्याने सुरक्षितरीत्या उतरवण्यात आली.

त्यानंतर गोमय मारुतीचे मूळ दगडी फ्रेमचे स्वरूप दिसू लागले आहे, ते आश्चर्य चकित करणारे आहे, आता हे मूळ स्वरूप स्पष्ट दिसू लागले आहे. यावेळी विश्वस्त सुधीर शिरवाडकर, विश्वस्त ऍड. भानुदास शौचे, हेमा शिरवाडकर, पुजारी रमेश कुलकर्णी उपस्थित होते.