छत्रपतींच्या पुतळ्यांचे नुतनीकरण

आ. कांदेंतर्फे निधी मंजूर; सोनवणेंचे उपोषण स्थगित
छत्रपतींच्या पुतळ्यांचे नुतनीकरण

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण (Renovation of the statue) करण्यासाठी आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांनी आमदार निधीतून 20 लाख रूपये मंजूर करत नुतनीकरण कामाचे उद्घाटन केले. यामुळे पुतळा नुतनीकरणासाठी उपोषणाव्दारे सुरू केलेले आंदोलन (agitation) सामाजिक कार्यकर्ता संगीता सोनवणे यांनी तुर्तास मागे घेतले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची दुरवस्था दूर होवून नुतनीकरण केले जावे या मागणीसाठी संगीता सोनवणे यांनी आजपासून उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची माहिती मिळताच आ. सुहास कांदे यांनी उपोषण स्थळी भेट देत सोनवणेंसह मराठा महासंघाच्या (Maratha Federation) कार्यकर्त्यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यात येत असून आजच नुतनीकरणाच्या कामाचे भुमीपुजन (bhumipujan) करत असल्याचे जाहीर केले.

तालुक्यातील महापुरूषांच्या स्मारकांची देखील देखभाल केली जाईल, अशी ग्वाही देत आ. कांदे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे नूतनीकरण करत असताना त्याचे डिझाईन सर्वानुमते ठरवून केले जाईल जेणे करून स्मारक सुंदर व सुशोभित दिसेल यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष राजेश कवडे (rajesh kawade) यांनी मार्गदर्शन करतांना स्मारकाची दुर्दशा लक्षात न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभारण्याचे काम प्रस्तावित असून त्यासाठी शासनाची परवानगी मिळावी याकरिता आ. कांदेंच्या मार्गदर्शनाखाली आपण व नगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यावेळी आ. कांदे यांनी पुतळ्याच्या नुतनीकरणास निधी देत कामास प्रारंभ केल्याबद्दल मराठा महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महासंघाचे तालुकाध्यक्ष भीमराव लोखंडे यांनी यापुढे कोणत्याही महापुरुषांच्या अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा पालिका प्रशासनास दिला.

कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, बाळासाहेब कवडे, चंद्रशेखर कवडे, मुख्याधिकारी विवेक धांडे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, भास्कर झाल्टे, सुरेश शेळके,विनोद डमरे, विशाल वडगुले, विष्णू चव्हाण, सिध्देश खरोटे, नितीन सोनवणे, सद्दाम शेख, फिरोज शेख, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com