अक्षय ऊर्जा भविष्याची ऊर्जा

अक्षय ऊर्जा भविष्याची ऊर्जा

नाशिक | शुभम धांडे | Nashik

भारतीय रिन्यूएबल एनर्जी डे (Renewable Energy Day) दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणार्‍या ऊर्जेची म्हणजेच साध्या भाषेत विजेची गरज भागवण्यासाठी अजूनही खनिज इंधनांचाच वापर मुख्यत: केला जात आहे...

परंतु यामुळे प्रदूषणासारख्या (Pollution) समस्या वाढून जीवसृष्टीला त्रास होत आहे. यासाठीच अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देणे गरजेचे आहे.

2004 सालापासून, नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात हा दिवस साजरा होऊ लागला आहे. पारंपरिक वीज जाळ्यावरील ताण कमी होऊन ऊर्जानिर्मितीचे विकेंद्रीकरण व्हावे असाही हेतू यामागे आहे. आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा मोठ्या प्रमाणात जाळला जातो.

यामुळे जंगलतोड तर होतेच, शिवाय धूर, आरोग्य, आग यांसारखे इतर प्रश्न निर्माण होतात. अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने बरीच उत्तरे मिळतील. यांमध्ये सौर, पवन, कृषी अवशेष, जल, सेंद्रीय कचरा, जैव अवशेष इत्यादींपासून मिळणार्‍या विजेचा समावेश होतो.

आपण हे करू शकतो

दैनंदिन जीवनातील ऊर्जा वापर तपासून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा वापरावर भर देणे. अशा ऊर्जेची माहिती देणारे प्रकल्प- नमुने इ. बनवणे. सोलर हिटर, सौरदिवा यांसारख्या उपकरणांच्या वापरावर भर देणे. बाग रस्ते या ठिकाणीसुद्धा सौर ऊर्जेचे दिवे वापरता येतील.

पर्यायी ऊर्जा

ऊर्जा थेट पर्यावरणाशी संबंधित आहे. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत (कोळसा, वायू, पेट्रोलियम इ.) मर्यादित प्रमाणात असण्याबरोबरच पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहेत. दुसरीकडे, ऊर्जेचे असे पर्याय आहेत जे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत.

ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलापासून संरक्षण

अक्षय ऊर्जा स्त्रोत वर्षभर सुरक्षित, उत्स्फूर्त आणि विश्वासार्ह आहेत, तसेच ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतात मोठ्या प्रमाणात बायोमास, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस आणि लहान जलविद्युत आहे.

भविष्यात...

भारत 2022 पर्यंत 175 ॠथ, नूतनीकरणक्षम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय भविष्यात साध्य करेल.स्वच्छ ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी जगातील अक्षय ऊर्जेची सर्वात मोठी विस्तार मोहीम याद्वारे राबवली जात आहे. पवन-सौर संकरित ऊर्जा प्रकल्प, किनारपट्टीवरील पवन ऊर्जा प्रकल्प, बायोमास ऊर्जा, सौर उद्याने आणि विकास विकसित करण्यासाठी योजना सुरू झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com