वीरपुरुषांचे स्मरण आवश्यक : क्षीरसागर

वीरपुरुषांचे स्मरण आवश्यक : क्षीरसागर

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

प्रभू श्रीराम (Shri Ram), सम्राट चंद्रगुप्त (Samrat Chandragupta), कृष्णदेवराय (Krushnadevrai), छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आदी पराक्रमी महापुरुष तसेच राष्ट्रजीवनाच्या दर्शनशास्त्रे, कला, विज्ञान इत्यादी विविध क्षेत्रात महान व्यक्तींनी केलेले कार्य हे विजयी पर्व आहे.

स्वतंत्र भारतात सोमनाथ मंदिरचा जीर्णोद्धार, अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम (Shri Ram) जन्मभूमीवर भूमिपूजनास (bhumipujan) पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांची उपस्थिती हे सर्व विजयी पर्व असून विजयादशमीच्या (Vijayadashami) निमित्ताने त्या सर्वांचे स्मरण करणे औचित्याचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) (RSS) पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर (Dilip Kshirsagar, Head of Publicity, West Maharashtra Province) यांनी केले.

रा. स्व. संघाच्या लासलगाव (lasalgaon) शस्त्रपूजन (weapon worship) उत्सवाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून क्षीरसागर बोलत होते. परमवैभव कल्पना स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांसारख्या (Lokmanya Tilak) महापुरुषांच्या राष्ट्र उभारणीच्या विचारांची प्रेरणा घेऊनच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी 1925 च्या विजयादशमीस संघाची स्थापना केली. समूहधर्माची उपासना केली तेव्हाच हे राष्ट्र विजयी होत राहिले.

समाज संघटन हीच आजची शक्ती असल्याचे ते म्हणाले. संघाच्या परमवैभव कल्पनेत केवळ अभिजनांचा नव्हे तर बहुजनांचा विकास अपेक्षित आहे. महात्मा गांधींचा शेवटच्या माणसाचा विचार करणे व पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय कल्पना हेच स्पष्ट करतात. समाजाचा सर्वांगीण विकास (development of society) अपेक्षित असून त्यात सृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण तसेच धर्माचा आधार असावा, असे ते म्हणाले.

संघाची शतकाकडे वाटचाल

रा. स्व. संघ शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असून आगामी काळात वंचितांसाठी सेवाकार्य, कुटुंब व्यवस्था दृढीकरणासाठी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता, गोसेवा व गाय आधारित शेती, ग्रामविकास आदी क्षेत्रात समाजाच्या सहभागाने गतीने परिवर्तन घडवण्याचा संघाचा आग्रह असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी स्वयंसेवकांनी घोषवाद्य याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे खडकमाळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी संजय वामन गवळी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. याप्रसंगी स्वयंसेवकांसह महिला व पुरुष उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com