कोविड रुग्णांसाठी रेमडिसिव्हीरचा पुरवठा

खा. हेमंत गोडसे यांचे प्रयत्न; गरजू रुग्णांना दिलासा
कोविड रुग्णांसाठी रेमडिसिव्हीरचा पुरवठा

सिन्नर । वार्ताहर

सिन्नर येथील कोविड केअर रुग्णालयातील गरज असणार्‍या रुग्णांसाठी रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या तुडवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मागणीनंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा करत रेमडिसिव्हीर उपलब्ध करुन दिले. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे...

रेमडिसिव्हीर अभावी अत्यवस्थ रुग्णांची स्थिती खालावत चालली होती. रेमडिसिव्हीर मिळवितांना नातेवाईकांची ससेहोलपट व आर्थिक पिळवणूकही होत होती. राजाभाऊ वाजे यांनी खा. गोडसे यांच्याशी रेमडिसिव्हीर पुरवठ्याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.

सिन्नरच्या रुग्णालयामधील गंभीर परिस्थिती खा. गोडसे यांच्या निदर्शनास आणून दिली. रुग्णांची गरज विचारात घेऊन खा. हेमंत गोडसे यांनी तातडीने पुरवठा केला. रेमडिसिव्हीर पुरवठा अधिकारी आवळकंठे यांच्यासोबत गोडसे यांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष किरण डगळे, शिवसेनेचे कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार उपस्थित होते.

सिन्नर शहरातील 6 खाजगी कोविड उपचार केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय, इंडियाबुल्स सेंटर येथील रुग्णांसाठी रेमडिसिव्हीरची गरज आहे.

रेमडिसिव्हीरची गरज असलेले रुग्ण, त्यासाठी केलेली मागणी व झालेला पुरवठा याबाबतची वस्तुस्थिती खा.गोडसे यांनी आवळकंठे यांच्यासमोर ठेवली. नगराध्यक्ष डगळे यांनीही कोविड रुग्णांना तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.

उपलब्ध साठ्यापैकी 36 रेमडिसिव्हीर तातडीने देण्यात आले. आणखी साठा उपलब्ध होताच सिन्नरला मागणीनूसार पुरवठा करण्याचे आश्‍वासन आवळकंठे यांनी या बैठकीत दिले. इंडियाबुल्स येथील कोविड सेंटर व सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयालाही रेमडिसिव्हीर इंजेक्शनची गरज आहे.

रुग्णांना तातडीने इंजेक्शन मिळण्यासाठी सदरच्या मागणीनुसार पुरवठा करावा अशा सूचना खासदार गोडसे यांनी डॉ. सौंदाणे यांना दिल्या. सिन्नरला रेमडिसिव्हीर इंजेक्शन तातडीने पाठवण्यात येतील असे आश्‍वासन डॉ. सौंदाणे यांनी यावेळी दिले.

ज्या रुग्णाला खरोखरच तातडीची गरज आहे. अशा रुग्णांना प्राधान्यक्रमाने इंजेक्शन देण्यात येणार आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातलगांची धावपळ होत होती. ज्यादा दर देऊनही ते उपलब्ध करता येत नव्हते. खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून इंजेक्शन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे विशेष आभार.

राजाभाऊ वाजे, माजी आमदार

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com