नाशकात पुन्हा रेमडेसिवीरचा काळाबाजार; तीन नर्स, एक मेडिकल बॉय ताब्यात

नाशकात पुन्हा रेमडेसिवीरचा काळाबाजार; तीन नर्स, एक मेडिकल बॉय ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी

नाशकात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मुळ किंमतीपेक्षा जादा दरात विक्री करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून पाचव्या संशयिताचा शोध सुरु आहे. या घटनेतील संशयित महिला खासगी रुग्णालयातील नर्स आहेत तर दोघे मेडिकल बॉय असल्याचे समोर आले आहे...

आज दुपारी चौघांनाही न्यायालयात दाखल केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, के के वाघ कॉलेज जवळ रेमडेसीवीरची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती.

यानंतर याठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवत २७ हजार रुपये प्रमाणे दोन इंजक्शन विक्री करताना आडगाव पोलिसांनी रंगेहाथ या संशयितांना ताब्यात घेतले.

चार संशयितांमध्ये तीन महिलांचा समावेश असून त्यांची नावे जागृती शार्दूल, श्रुती उबाळे, स्नेहल पगारे अशी आहेत तर कामेश बच्छाव नामक एक मेडिकल बॉय आहे. तसेच या मेडिकल बॉयच्या मित्राच्या शोधात पोलीस आहेत.

या घटनेत ताब्यात घेतलेल्या तिन्हीही महिला मुंबई नाका परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये मध्ये नर्सेस म्हणून कार्यरत असल्याचे समजते. तर मेडिकल बॉय असलेला संशयितदेखील दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षण इरफान खान यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चांदणी पाटील, वैभव परदेशी, दशरथ पागे, बनकर व सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com