त्र्यंबकेश्वर मंदीर
त्र्यंबकेश्वर मंदीर
नाशिक

त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमणार ! धार्मिक विधींना सुरूवात होणार?

पण प्रशासनाचे आदेश नाही

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेले धार्मिक विधी लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत आमदार हिरामण खोसकर यांनी दिले. परंतु अद्याप प्रशासन कडून कोणतेही आदेश नसल्याने तळ्यात मळ्यात परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत काल (दि.१७) रोजी पुरोहितांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी धार्मिक विधी सुरू करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.

पुरोहित संघाची एक नियंत्रण समिती करून सोशल डिस्टनसीचे सर्व नियम तंतोतंत पाळून एक नियमावली सादर करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक गिरासे, सी ओ संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी भिमाशंकर ढोले यांना या पूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आज कुशावर्त तीर्थ येथे आमदार हिरामण खोसकर व सर्व अधिकाऱ्यांनी भेट देत धार्मिक विधी सुरू करण्याचे संकेत दिले. परंतु अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणताही आदेश देण्यात आलेला नाही.

याप्रसंगी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज कान्नव, विजय गांगुर्डे, पुरोहीत संघातर्फे डाॅ दिलीप जोशी, पंकज धारणे, मंगेश दिघे, समीर पाटणकर, नगरसेवक सागर उजे आदिंसह काही व्यापारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com