हरणबारीच्या आवर्तनाने रब्बीला दिलासा

हरणबारीच्या आवर्तनाने रब्बीला दिलासा

नामपूर । वार्ताहर Nampur

हरणबारी धरणातून (Haranbari Dam) चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी (rabbi season) दुसरे आवर्तन रविवारी (दि. 30) पहाटे सोडण्यात आल्याची माहिती हरणबारी प्रकल्पाचे शाखा अभियंता विजय आहेर यांनी दिली.

बागलाणसह (baglan) मालेगाव तालुक्याला (malegaon taluka) वरदान ठरणारा हरणबारी प्रकल्प यंदा पूर्ण क्षमतेने भरला असून यंदा सिंचनासाठी एकूण 3 आवर्तने सोडण्याचा निर्णय पाणी वाटप सहकारी संस्था (Water Allocation Co-operative Society) व कालवा निरीक्षक समितीच्या (Canal Inspection Committee) बैठकीत झाला होता. त्यानुसार डिसेंबर महिन्यात पाहिले आवर्तन सोडण्यात आले होते. दुसरे आवर्तन 30 तारखेला सकाळी 6 वाजता सोडण्यात आले आहे. तिसरे आवर्तन मार्चपूर्वीच सुटणार असून उर्वरित पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी राखीव राखणार आहे.

मोसमखोर्‍यात यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी वैतागला असून अनेक गावात शेतीपंपाना वीजपुरवठा (Power supply) होत नाही. अनेक ट्रान्सफॉर्मर जळीत झाले आहेत. गहू, हरभरा, कांदा पिकांना पाण्याची खूपच गरज आहे. 300 क्युसेस पाणी सोडण्यात आले असून किमान आठवडाभर नदीत पाणी चालू राहील.

या आवर्तनामुळे शेतीला पाटामार्फत पाणी पुरवले जात असल्यामुळे रब्बी पिकांना मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया मोसमखोर्‍यातील पाणी वाटप सहकारी संस्थांचे पदाधिकारी अशोक सावंत, खेमराज कोर, बाळासाहेब भदाणे, राजाराम पाटील, पवन ठाकरे, नंदलाल शिरोळे, नरेंद्र सोनवणे आदिंंनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com