थंडीच्या कडाक्याने रब्बीला दिलासा

थंडीच्या कडाक्याने रब्बीला दिलासा

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

गत तीन ते चार दिवसापासून शहरासह तालुक्यात थंडीचा (cold) कडाका वाढला आहे. रब्बी हंगामातील (rabbi season) कांद्यासह गहू, हरभरा, मका, बाजरी या पिकांना या थंडीचा लाभ मिळत असल्याने शेतकरी (formers) सुखावले आहेत. शहर व थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात (rural area) सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

शहर व तालुक्यात तब्बल एक महिन्यापासून थंडी (cold) गायब झाल्याने शेतकरीं चिंताक्रांत झाले होते. थंडीअभावी शेतकर्‍यांची रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका व कांदा ही पिके धोक्यात सापडली होती. अतिथंडी रब्बी हंगामातील (rabbi season) पिकांसाठी पोषक असून पिके जोमात येतात व रोगाचा प्रादूर्भाव देखील या थंडीत कमी जाणवतो. थंडी गायब होऊन निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे (Cloudy weather) कांदा, हरभरा, मका, गहू आदी पिके धोक्यात येऊन बाधित होण्याचे प्रमाण वाढले होते.

पिके वाचविण्यासाठी शेतकरी (farmers) रासायनिक औषधांच्या फवारण्या करून पिके वाचवण्यासाठी धडपड करीत होते. त्यामुळे शेतकर्‍यांतर्फे कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा केली जात होती. गत तीन-चार दिवसापासून पडत असलेल्या कडाक्याच्या थडीमुळे पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या थंडीमुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली. थंडीने तात्पुरती का होईना रब्बी हंगामातील उभ्या पिकांच्या वाढीची चिंता दूर झाली आहे.

दाणेदार खतांची टंचाई

तालुक्यात एक महिन्यापासून महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्यामुळे पिकांना पाहिजे ते खत उपलब्ध नसल्याने उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. तालुका कृषी विभागाने रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. दरम्यान, तालुक्यात दाणेदार खंताची टंचाई संदर्भात तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या संदर्भात त्वरीत माहिती घेण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com